सत्तेचा अहंकार चढलेल्या भाजप नेत्यांना जिल्ह्यातील मतदार जागा दाखवून देतील - अमरसिंह पंडितगेवराई ( रिपोर्टर) : बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी असल्याचा गवगवा विरोधकांकडून केला जातो मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकजुटीने काम करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील. जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळा असून शेतकऱ्यांसह अनेकांचा आपेक्षा भंग भाजपा सरकारने केला आहे. त्यामुळे मतपेटीतून मतदार आपला रोष व्यक्त करतील व सत्तेचा अहंकार चढलेल्या भाजपच्या नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत मतदार नक्की हिशोब चुकता करून त्यांची जागा दाखवतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.
दरम्यान आपण लोकसभा मतदारसंघात घड्याळाचा प्रचार सुरू केला असून पक्ष सांगेल त्या उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा नक्कीच विजय होईल असा दृढ विश्वास व्यक्त करत आपण संभाव्य उमेदवार असल्याचे ही संकेत त्यांनी दिले. बुधवार दि.13 रोजी अमरसिंह पंडित यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपण आक्रमक पवित्रा घेणार असल्याची भूमिका जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या आदेशानुसार त्यांचीच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काल बुधवार दि. 13 रोजी दुपारी दोन वाजता येथील खाजगी अतिथीगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बीड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. आपण सध्या तरी संभाव्य उमेदवार म्हणून जिल्ह्यात घड्याळाचा प्रचार सुरू केला आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे भाजपाचा खासदार आहे. या पाच वर्षात विद्यमान खासदारांनी अपवाद वगळता कुठेही विकासाची कामे पूर्ण केली नाहीत. कर्तव्य शुन्य खासदार म्हणून त्यांची गिनीज बुकात नोंद केली पाहिजे,असे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजना व आश्वासन हवेतले बुडबुडे ठरले. शेतकरी देशोधडीला लागला. पिक विमा दिला नाही. कर्ज माफ केले, त्यात जाणीवपूर्वक चुका केल्या. असा गंभीर आरोप करून, ते म्हणाले की, मुस्लिम व धनगर समाजाच्या भावनांचा विश्वासघात केला.आरक्षण लागू करण्याच्या बाता मारणारे हे जातीयवादी लोक समाजाने ओळखले आहेत. बीडच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अहंकार आला आहे. रेल्वे आली म्हणून पाठ थोपटून घेणार्‍यांना काय म्हणायचे हेच कळत नाही आणि तेच लोक गेवराई मतदारसंघात येऊन जनतेला वेडे व पागल म्हणतात ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. त्याचा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत मतदार मायबाप नक्की हिशोब करतील असा विश्वास ही अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला आहे. तर माझ्या मातृभूमीतील मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त करत भाजपा सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला. तर मुस्लिम आरक्षणा विषयी कसलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम, धनगर समाज भाजपाला जागा दाखवून देतील व मतदारसंघातील जनतेला वेडे,पागल ठरवून काही अंहकारी नेते दादागिरी करत असून लोकसभा निवडणुकीत मतदार त्यांचा नक्की हिशोब करतील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review