पिंपळनेर पोलिसांनी राशनचा माल पकडला  टेम्पोत गव्हासह तांदळाचे शंभर पोते 


हा राशनचा माल कोणाचा?
बीड (रिपोर्टर):- एका टेम्पोद्वारे राशनचा माल जात असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घाटसावळी जवळ टेम्पो ताब्यात घेतला असता या टेम्पोत ५० पोते गहू आणि ५० पोते तांदळाचे कट्टे आढळून आले. पोलिसांनी गहु, तांदळासह टेम्पो जप्त केला. या प्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा राशनचा माल नेमका कोणाचा आहे आणि तो कोठे चालला? याचा तपास या घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांनी बीड तहसीलदारांना पत्राद्वारे याची माहिती कळविली. तहसीलदार या प्रकरणाचा अधिक छडा लावतील. ही कारवाई पहाटेच्या दरम्यान करण्यात आली. 
परळीहून बीडकडे निघालेला टेम्पो (क्र. एम.एच. १६ ए.सी. ४८८४) यात राशनचा माल असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना झाल्यानंतर पहाटेच्या दरम्यान पिंपळनेर ठाण्याचे पिआय झिंुजुर्डे, विजय गायकवाड, सुरवसे, राठोड या कर्मचार्‍यांनी घाटसावळी जवळ टेम्पो पकडला. या टेम्पोची झडती घेतली असता त्यात पन्नास पोते गहुव पन्नास पोते तांदळाचे कट्टे आढळून आले. हा राशनचा माल नेमका कोणाचा आहे? व कुठे जात होता याचा तपास सुरू असून या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी पत्राद्वारे बीड तहसीलदारांना टेम्पो पकडल्याची माहिती कळवली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातल्या पुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचाराचे एक-एक प्रकरण उघडकीस येत आहे. हा तांदुळ नेमका कुठल्या तालुक्यातला आहे आणि तो कोणत्या गोडाऊन किपरने इतर ठिकाणी पाठवला या सर्व बाबींचा छडा पुरवठा विभाग लावेल का? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review