उपनिबंधक कार्यालयासमोर गटसचिवांचे धरणे आंदोलन


पगाराअभावी गटसचिवांवर उपासमारीची वेळ
बीड (रिपोर्टर):- जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत काम करणार्‍या गट सचिवांना पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज सर्व गटसचिवांनी जालना रोडवर असलेल्या उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. 
छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी २०० कोटी रुपये प्राप्त झाले. या रकमेतून दोन टक्के रक्कम गटसचिवांना देणे बंधनकारक असते. या दोन टक्क्यातून गटसचिवांना त्यातून पगार मिळत असतो मात्र जिल्हा बँकेने गटसचिवांना दोन टक्के इतकी रक्कम दिली नसल्याने त्यांचा पगार रखडलेला आहे. पगारासाठी आज गटसचिवांनी जालना रोडवर असलेल्या उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी अनेक गटसचिवांची उपस्थिती होती. गटसचिवांना पगार देण्यात यावा, गटसचिवांचा बेकायदेशीर पगार कमी केलेला पूर्ववत द्यावा, गटसचिवांना अतिरिक्त पदभाराचा मोबदला मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी दिलीप शेळके, श्रीधर अंडील, उद्धव देशमुख, बंडु लोंढे, अशोक किर्तने, बब्रुवान इथापे, बदरे, कुमार देशमुख, वसंत साबळे, बाळु कुलकर्णी, कचरू पवार, उनवणे, कोळीसह आदींची उपस्थिती होती.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review