सरपंच गावात राहा म्हणत ,टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

मंजरथ गावाला सरपंचांनी कायम रहावे व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी 
-
माजलगाव (रिपोर्टर):- तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीला ग्रामसेवक द्यावा व सरपंचांनी कायमस्वरूपी गावात रहावे या मागण्यांसाठी ग्रामस्थांच्या वतीने टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन आज सोमवारी करण्यात आले.
तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगांवकर या गावाला वेळ देत नाहीत. कारण त्या गुजरातमध्ये कंपनीत जॉब करतात, त्यामुळे गावक-यांचे कोणतेच काम होत नाहीत व गावाला ग्रामसेवकही नाही. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आंदोलने, उपोषण केले परंतु प्रशासनाला याचे काही देणेघेणे नाही, असे दिसून येते. दलित लोकांसाठी रमाई व आदिवासीसाठी शबरी घरकुल योजनाचे मंजरथ साठी निधी आला परंतु सरपंच व ग्रामसेवक गावात नसल्यामुळे कोणतेच कामे व्यवस्थीत होत नाहीत. त्यामुळे गावात नियमित सरपंच व तात्काळ ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्ञानेश्वर वाघमारे, भिमराव कदम, पाडमुख भगवान, राजरतन डोंगरे, दत्ता वाघमारे, राजेश वाघमारे, तुकाराम चोरमले, संदिपान डोंबाळे, संतोष वाघमारे, तात्याभाउ थोरात सहभागी झाले होते. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review