उठ तांडो, वटा दांडो अन्याय करेवाळेरो,फोड मुंडो


स्वाती राठोड मृत्यूप्रकरणी बंजारा समाज रस्त्यावर
गेवराईमध्ये रस्ता रोको आंदोलन
गेवराई (रिपोर्टर):- स्वाती राठोड मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आज तालुक्यातील बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता. आज आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. आंदोलनात विद्यार्थ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  यावेळी संतप्त आंदोलनकर्ते उठ तांडो, वटा दांडो, अन्याय करेवाळेरो,फोड मुंडो यासह इतर कघोषणा देत होते. 
वडवणी तालुक्यातील स्वाती राठोड यामुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अद्यापही फरार आहे. फरारी आरोपी जेरबंद करण्यात यावे, राठोड कुटुंबियास आर्थिक मदत द्यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासह इतर मागण्यासाठी आज बंजारा समाजाच्यावतीने आंबेडकर चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पि.टी.चव्हाण, बाबुराव जाधव, राठोड अण्णासाहेब, गणेश चव्हाण, सर्जेराव जाधव, अंबादास सांगळे, अप्पासाहेब चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, अनिल राठोड, नितीन चव्हाण, नवनाथ आडे, दिनेश पवार, बी.एम.पवार, मोहन जाधव यांच्यासह आदींची  उपस्थिती होती. आंदोलनात विद्यार्थ्यांनी आंदोलनातही सहभाग घेतला.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review