दत्ता चोलेचा अपघात की घातपात? आज दुपारपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते

दत्ता चोलेचा अपघात की घातपात?
आज दुपारपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते
बीड (रिपोर्टर):- मोटर सायकलवर जाणार्‍या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजता रामनगर या ठिकाणी घडली. सदरील तरूणाचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्याचा घातपात करण्यात आला हे अद्याप निष्पन्न झालेेले नव्हते. मात्र आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय पित्याला असून पित्याने त्याबाबतची तक्रार जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीकडे केली. दुपारी १२ वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. 
दत्ता चोले (वय २५ रा.खडकी देवळा ता.वडवणी) हा युवक बलभीम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. काल सायंकाळच्या दरम्यान सदरील तरूण बीडपासुन काही अंतरावर असलेल्या रामनगर रस्त्याने जात होता. यावेळी त्याचा अपघात होवून तो जागीच ठार झाला. सदरील हा तरूण एम.एच.२३ एटी ५८६५ या मोटर सायकलवर होता. या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असून त्याचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात बीड ग्रामीण पोलीसांनी शवविच्छेदनासाठी रात्रीच आणलेला होता. आज सकाळी १२ वाजेपर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते. या मृत्यूबाबत दत्ता चोले याच्या पित्याने संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी पोलीसाकडे केली. दत्ता चोले याच्या अपघाताचे वृत्त समजताच बलभीम महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने जिल्हा रूग्णालयामध्ये आले होते. या दुर्दैवी घटनेने खडकीदेवळा येथे हळहळ व्यक्क्त केली जात आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review