अंबाजोगाईजवळ ट्रकने बुलेटला उडवले


एक ठार, दोघे जखमी
अंबाजोगाई (रिपोर्टर):- भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने बुलेटला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार तर दोघे जण जखमी झाले. ही घटना लोखंडी सावरगाव जवळ लातूर टी-पॉईंट येथे रात्रीच्या दरम्यान घडली. 
रवि उत्रेश्वर धायगुडे (वय २६, रा. बनसारोळा ता. केज) हा आपल्या मित्रांसोबत बुलेट गाडीवर अंबाजोगाईहून बनसारोळ्याकडे जात होता. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर टी-पॉईंटजवळ त्याच्या बुलेटला लातूरकडून येणार्‍या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात रवि धायगुडे हा गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला तर त्याचा मित्र अतुल बोराडे व जोगदंड हे दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review