विनाअनुदानित कर्मचार्‍यांची काळी दिवाळी

शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर कर्मचारी बसले उपोषणाला
बीड (रिपोर्टर):- २० टक्क अनुदान पात्र सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम विनाअनुदानित) शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या दारासमोर उपोषण करण्यात येत आहे. भर दिवाळीत कर्मचार्‍यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे.
अघोषित असणार्‍या सर्व शाळा निधीसह घोषित करणे, २० टक्के अनुदानपात्र सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. सदरील मागण्यांकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी संघटनेच्या वतीने भर दिवाळी दिवशी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी वैजिनाथ चाटे, जितेंद्र डोंगरे, लक्ष्मण जगताप, मुक्ता माटे, तुकाराम शिंदे, प्रताप पवार, गवळी, रवींद्र, भागवत यादव, रेड्डी, गरुड, वैजिनाथ शिंदे, ढगे, शेख, जाधव, कुंभार, मुंडे, वाव्हळ, कळसकर यांच्यासह आदींचा सहभाग आहे.
००००

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review