मुख्याधिकारी, नगराध्यक्ष साहेब, फराळाला या दारात बसून फराळ करू 

न.प.च्या घाणेरड्या राजकारणावर ललित आब्बड यांचे निमंत्रण
बीड (रिपोर्टर):- समाजकारणापेक्षा कायम राजकारण करणार्‍या नगरपालिकेने त्यांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या लोकांच्या दारासमोरच्या नाल्या काढतानाही राजकारण केल्याचे उघड झाले असून महावीर चौकात राहणारे ललित आब्बड यांच्याच दारापुढची नाली न काढता सणासुदीच्या काळात नगरपालिकेने राजकारण केल्याने ललित आब्बड यांनी थेट नगराध्यक्षांसह न.प.च्या मुख्याधिकार्‍यांना भ्रमणध्वनी करून फराळासाठी या दारात बसून फराळ करू, असे निमंत्रण दिले. 
सातत्याने वादाच्या भोवर्‍यात राहणार्‍या बीड नगरपालिकेने आता त्यांच्याविरोधात आवाज उठवणार्‍या शहरातील नागरिकांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. महावीर चौक भागात ललित आब्बड हे राहतात. नगरपालिकेच्या चुकीच्या धोरणाविरोधात ते सातत्याने आवाज उठवतात. याचाच राग मनात धरून की काय, दर दिवाळीच्या काळात त्यांच्या घरासमोरची नाली नगरपालिकेने जाणीवपूर्वक काढली नाही. विशेष म्हणजे त्यांचे घर सोडून न.प. कर्मचार्‍यांनी स्वच्छता मोहीम राबवल्याचे दिसून आल्याने आब्बड यांनी थेट भारतभूषण क्षीरसागर आणि न.प.चे मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनी करून फराळाला या, बाहेर बसून फराळ करू, असे निमंत्रण दिले.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review