कुक्कडगावच्या सरपंच पतीची पत्रकारास शिवीगाळ


पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
कुक्कडगाव (रिपोर्टर):- ग्रामपंचायतच्या बातम्या काम छापतो? असे म्हणत कुक्कडगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पतीने पत्रकारास जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्या असून या प्रकरणी सरपंच पतीविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. 
रिपोर्टरचे कुक्कडगाव प्रतिनिधी सतीश गायकवाड यांनी चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराबाबत बातमी छापली होती. ही बातमी सरपंचपती वशिष्ट कुटे यांना चांगलीच झोंबली. त्यांनी सतीश गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्या. या प्रकरणी काल गायकवाड यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कुटे यांच्याविरोधात ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत असून दोषीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review