ताज्या बातम्या

रेल्वेस्टेशनमध्ये टेम्पो घुसला 

रेल्वेस्टेशनमध्ये टेम्पो घुसला 
प्रवासी महिला जखमी 
परळी (रिपोर्टर):- भरधाव वेगात आलेला टेम्पो रेल्वे स्टेशनमध्ये घुसल्याने यामध्ये एक प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना आज सकाळी शहरामध्ये घडली आहे. गर्दीत टेम्पो घुसल्याने स्टेशनमध्ये एकच पळापळ सुरू झाली होती. 
आज सकाळी मालवाहू टेम्पो (क्र. ए.पी. २८ पी.ए. १३१९) रेल्वेस्टेशनमध्ये आला होता. या वेळी चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने सदरील टेम्पो प्रवाशांच्या घोळक्यात शिरला. यात सखुबाई बाबुराव टेकाळे (रा. उमरगा जि. लातूर) ही महिला जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्दीत घुसलेला टेम्पो एका खांबाला धडकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे रेल्वे स्टेशनमध्ये एकच धावपळ उडाली होती.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review