ताज्या बातम्या

धारूर न.प.च्या कर्मचार्‍यांचा सहा महिन्यांपासून पगार नाही 

कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू
किल्ले धारूर (रिपोर्टर):- धारूर नगरपालिका अंतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा गेल्या सहा महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतनासाठी कर्मचार्‍यांनी कामकाजावर बहिष्कार टाकून नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. 
शहराअंतर्गत रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र या कर्मचार्‍यांचा नगरपालिका प्रशासनाने सहा महिन्यांपासून पगार दिला नाही. पगारासाठी अनेक वेळा सीईओकडे निवेदन दिले, मागणी केली, मात्र सीईओ दखल घेत नसल्याने आज कर्मचार्‍यांनी कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे. या वेळी चव्हाण, वडगावकर, वाघमारे, लोखंडे, फुंदे, अर्जून माने, भागवत डोईफोडे, प्रशांत सिरसट यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review