ताज्या बातम्या

गेवराई शिवसेनेच्या शेतकरी हक्क मोर्चाने दणाणली

बदामरावांच्या नेतृत्वाखाली एकवटले शिवसैनिकांसह शेतकरी

गेवराई (रिपोर्टर):- गेवराई मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, खरीप पिकांची आनेवारी वस्तूनिष्ठ द्या, मतदारसंघ वन्यबाधीत क्षेत्र म्हणून घोषित करा, जयभवानी साखर कारखाना व जयमहेश कारखान्याने एफआरपीप्रमाणे उसाला भाव देऊन शेतकर्‍यांचे पैसे तात्काळ द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने तहसीलवर शेतकरी हक्क मोर्चा काढला. या मोर्चामध्ये परिसरातील शेकडो शेतकरी बैलगाड्यांसह सरकारविरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानापासून निघाला. तो आंबेडकर चौक, शिवाजी चौक, शास्त्री चौक मार्गे तहसीलवर जावून धडकला. आजच्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री बदामराव पंडित यांनी केले. सकाळपासूनच मोर्चासाठी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांसह शेतकरी सहभाग नोंदवण्यासाठी बदामराव पंडितांच्या निवासस्थानासमोर गर्दी करून होते. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा तहसीलकडे कुच करण्यासाठी निघाला. घोषणाबाजी करत उपस्थित मोर्चेकर्‍यांनी जयभवानी साखर कारखाना व जयमहेश साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे उसाला भाव देऊन शेतकर्‍यांना तात्काळ पैसे द्यावेत ही मागणी लावून धरत गेवराई विधानसभा मतदारसंघ वन्य प्राणी बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत करा, गेवराई मतदारसंघ आवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून घोषीत करा, तुरीचे पैसे तात्काळ द्या, मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, ऊसतोड मजूर व वाहतूक ठेकेदार यांचे राहिलेले डिपॉझिट कमिशन बील तात्काळ द्या, खरीप पिकांची आनेवारी वस्तूनिष्ठ द्या, या मागण्या घेऊन शिवसेनेचा मोर्चा आंबेडकर चौक, शिवाजी चौक, शास्त्री चौक मार्गे तहसीलवर जावून धडकला. या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्या घेऊन सहभागी जाले होते. सदरच्या मोर्चाचे रुपांतर तहसीलसमोर आल्यानंतर जाहीर सभेत झाले होते. या वेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, जिल्हा परिषदेचे सभापती युद्धाजित पंडित, पंचायत समिती सभापती अभयसिंह पंडित, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, जि.प. सदस्य आप्पासाहेब तळेकर, बाबूराव जाधव, अमोल करांडे, शेख एजाज, साहील देशमुख, बबलू खराडे, कालिदास नवले, रोहीत पंडीत, विजयकुमार वाव्हळ, बाबूराव जाधव, शिनु बेदरे, सुभाष घाडग, युवराज डोंगरे, उज्ज्वला भोपळे, पंढरीनाथ लगड, बापूराव चव्हाण, नानासाहेब मते यांच्यासह आदी शिवसैनिकांसह शेतकरी उपस्थित होते.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review